Saturday, November 1, 2008

ऐसी भी बाते होती है.....

किती दिवसानी blog परत लिहितो आहे.....
वर्षावर बरेच महिने उलटुन गेले...
कधी भरुन येते आभाळ...पण पाऊस पडत नाही...
ढग पुढे जात राहतात....
मग ढगान्च्या मागावर....in pursuit of happiness...
पण फ़क्त समुद्रापर्यन्त...
किनार्यावर आभाळ निरखत बसावे...
दाट सुरुच्या बनाच्या फ़टीतून समुद्र शोधावा...
दूरवर जाणारी होडी... आणि तिचा सोबती सुर्य....
सुर्य आधी क्शितिजापार होणार की होडी....किती निर्लोभ विचार...
"जी. ए." ची कुठली तरी हळवी गोष्ट आठवावी...
त्या गोष्टीची सय मनात खोलवर रुतवावी...
थोडा नशिबाला..थोडा देवाला दोष द्यावा...
सगळी मनातली डबकी प्रवाही होतात....वाहुन जातात...
किती मोकळ मोकळ वाटत तेव्हा...
अगदी देवाशी गप्पा मारता येतात.. मित्राप्रमाणे....
तो मस्त समजुत काढतो...
बहरलेला प्राजक्त आणि मोगर्याचा गन्ध...
आकाशाचा canvass आणि सन्ध्याकाळ्चे रन्ग...
मऊ मऊ रेती... फेसाळलेली लाट...
गार गार वारा... चान्दण्याचा थाट...
वार्याची शीळ...समुद्राची गाज...
"साहिर"ची लेखणी...."रफी" चा आवाज...
"आशे" चा स्वर...ज्याला तोड नाही...
अभी ना जाओ छोडकर... के दिल अभी भरा नही...


तात्पर्य काय !!!!
शुक्रवारी सन्ध्याकाळी Relax ची पाव-भाजी किवा दुर्गाची cold coffee चा बेत cancel झाला तर office मध्ये ढेकुण (मराठीत bugs) मारत बसु नये....लगेच घरी यावे...फार तर हिमेश रेशमियाचा "सा रे ग म प" वर आरडाओरडा बघुन लगेच झोपुन जावे....कसले कसले विचार....देवा....