Tuesday, July 31, 2007

समर्पक

मनावर ताबा असणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. ऋषिमुनींना सुद्धा ही गोष्ट महत् प्रयासाने जमली नाही, त्यापुढे आपल्या सारख्या पामरांची काय कथा. असे हे मन स्वतःच्याच तंद्रीत असते. जरा नीट विचार केला तर असे लक्षात येते की, ९९% वेळा आपण जी कृती करत असतो, त्याचा आणि मनातल्या विचारांचा दुरुनही संबंध नसतो. घरुन office ला जाताना/येताना विश्वोत्पत्ती चे रहस्य, कर्णाची बाजू सत्य का असत्य ते ही समोरची मुलगी फ़िरायला घेऊन जायला ठीक पण घरी नको असे असंख्य विचार मार्गात असतात. त्यात संध्याकाळी घरी जाताना पुण्यातल्या रस्त्यांची दुरावस्था, महापालिकेचा उद्धार, सगळ्यांना(माझ्यासकट) आत्ताच रस्त्यात कडमडायचे होते का... असे विचार येत असतात. ह्या विचारांच्या मार्गातच मग एक पुणेरी मायकेल शुमाकर रिक्षावाला त्याची फेरारी हात न दाखवता आडवी घालतो, आपण मग त्याला मनोमन आशीर्वाद देतो. विचारांचा रस्ता बदलतो. आपण office ला जात असतो, मन चंद्रावर जाऊन येते, थोडा वेळ भविष्यात डोकावते आणि शेवटी office च्या parking मध्ये परत भेटते. कामाच्या वेळी पण थोड्याफार फरकाने हेच चालु असते.

विचारांची क्रुतीशी ही असंबद्धतता मनाची एक प्रकारची धुंदी दर्शवते. ह्याच धुंदीत आपण आपले दिवस काढत असतो. Software जगतामध्ये Productive Work नावाची एक संकल्पना असते. Company ला Profit मिळेल असे कुठले उपयुक्त काम केले, त्यावरुन तो Resource Productive आहे की नाही हे ठरते.

दिवसभर कामात असताना देखील जेव्हा हे विचार मनात थैमान घालत असतात, तेव्हा जर संध्याकाळी आपण आपली कामाची Productivity काढली तर ती जास्तीत जास्त २०-३०% एवढीच भरते(असेच काही नाही....मॅनेजर, लीड नामक जीव काम करवून घेतात, पण त्यांना टाळायचे कसे? हाही विचार मनात कायम सुरु असतो.). मनाची ही उधाणता, बेधुंदपणा आपणास Realistic दुनियेपासुन दूर कुठल्यातरी काल्पनिक जगात जगायला लावतो. Realistic जगाशी नाळ काही तुटलेली नसते, परिणाम काय!! काम साचून राहते.

मनावर ताबा मिळवणे तर शक्य नाही, पण अशीच बेधुंद विचारांची लहर उठली, की त्या लहरीला ह्या व्यासपीठाचा किनारा द्यायचा, असा विचार......जेणे करुन कामात थोडे तरी लक्ष लागेल, Productive Work :-), मॅनेजर खुष, Appraisal, पगारवाढ, चांगल्या मैत्रिणी :P, चांगली बायको, चांगलं घर, चांगला संसार..........(ही पहिली लहर किनारा गाठणारी :-))

Blogच नाव ही माझी Creativity नाही. पूर्वी ई टीव्ही मराठीवर हर्षदा खानविलकरची 'बेधुंद मनाची लहर' नावाची मालिका यायची, तिच्यात बेधुंद College तरुणाईचे भन्नाट चित्रण होते...(सोनाली खरे सुंदर दिसायची त्याच्यात)....त्या अनुषंगाने हे नाव समर्पक वाटले .......बस्स......

Blogs चा स्वत:ला express करणे हा general उपयोग आहे पण blog चा असाही उपयोग करायचा विचार आहे......पटतो का बघा स्वत:ला विचारुन.........

मग हा किनारा गाठायला शेकडो लहरी उत्सुक आहेत............
एखादी फेसाळणारी लहर सुंदर दिसून जाईल.........
काही लहरी किनारी आपल्या खुणा ठेवून विरतील........
एखाद्या लहरीची गाज कोणाच्या तरी मनाला साद घालेल.........
कोणाला काही लहरी ओळखीच्या वाटतील.....
हळूवार पाय सोडा त्यांच्यात जेणेकरुन रेती मिसळून त्या गढूळ न होता पारदर्शक राहतील......
हो, पण एक आहे............
एखादी लहर पायाखालची वाळू काढून नेऊ शकते.......
पाण्यात जास्त खोल न शिरलेलेच बरे.........